म्हणून अभिनेता रितेश देशमुखने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक..

0
296

म्हणून अभिनेता रितेश देशमुखने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक..

सूरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आज उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री ज्या प्रकारे परिस्थिती हाताळत आहे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

अभिनेता रितेश देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या या कौशल्याने भारावून गेला आहे. याबाबत त्याने एक ट्विट केले आहे. ‘आपण सगळेजण एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहोत. करोना विषाणूबरोबरच आपण भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढा देत आहोत,’ असं त्याने म्हटले आहे.

दरम्यान, ‘या कठीण काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत स्पष्टपणे आणि जिव्हाळ्यानं आपल्याशी नियमिपणे संवाद साधत आहेत. त्यांचे यासाठी आपण कौतुक केले पाहिजे,’ असे म्हणत रितेश देखमुख यांने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur