मोठी बातमी; महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार, ठाकरे सरकारने केलं स्पष्ट

0
272

मुंबई | कोरोना व्हायरसचे संकट असतांना देशात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 14 एप्रिलनंतर परत आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मात्र घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधतांना त्यांनी ही माहिती दिली आहे.

मी 2 ते 3 दिवसातून तुमच्यासमोर येत आहे. आज येण्याचा कोणताही विचार नव्हता. लॉकडाऊन संपण्याच्या दिवशी रविवारीच तुमच्याशी बोलण्याचा विचार होता. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. यात पंतप्रधानांसोबत आमच्या सर्वांच्या तोंडावर पट्ट्या (मास्क) बांधलेल्या होत्या. आमच्या तोंडावर पट्ट्या बांधणं कुणालाही शक्य झालं नाही, मात्र कोरोना विषाणूने ते केलं. असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हंटल आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तसेच महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पुणे हे कोरोना संसर्गाचं प्रवेशद्वार ठरलं. त्यावेळी आपल्याला या देशांची यादी मिळाली आपण त्यांची तपासणी केली मात्र, काही देशांची तपासणी झाली नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यावर आता बोलण्यात अर्थ नाही. मात्र, आत्ता जे रुग्ण वाढत आहेत ते रोखण्यासाठी जिथं रुग्ण आढळले ते परिसर सील करण्यात येत आहेत.

आपण कोरोना व्हायरसचा वेग कमी राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र, मला महाराष्ट्रात कोरोनाच्या  रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा प्रयत्न पुढेही चालू असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

पंतप्रधानांच्या बैठकीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली होती. त्यावेळी मी सर्व माहिती देताना शेवटी हेच सांगितलं आहे की देशात लॉकडाऊन वाढो अथवा न वाढोे, पण मी महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्यास पुण्यातून सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईतही रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. जगभरातून विविध ठिकाणचे नागरिक सुरूवातीला मुंबईतच येतात. जेव्हा  आपण रुग्णांच्या तपासण्या सुरु केल्या होत्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती.

मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण देशात मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग आपण आता सील केले आहेत. जे कोरोना बाधित रुग्ण आपल्याला आढळले आहेत. त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करत आहे. आता पुढे समोरून रुग्ण येण्याची वाट आपण बघत नाहील आहोत. तर या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घरोघरी घरी जाऊन तपासण्या करत आहोत.  तसेच मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजारच्या वर गेली असल्याचीही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur