मोटारसायकल चोरीप्रकरणी टेंभुर्णीतील दोघांना अटक , तीन मोटारसायकली हस्तगत, बार्शी शहर पोलीसांची कामगिरी 

    0
    252

    बार्शी –

    मोटारसायकल चोरीप्रकरणी बार्शी शहर पोलीसांनी टेंभुर्णीतून दोन संशयितांना पकडून त्यांच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. शाहीर बाबुलाल पठाण रा. करमाळा चौक, टेंभुर्णी ता .माढा व सिध्देश्वर धर्मराज राऊत रा. शिवाजीनगर, टेंभुर्णी ता. माढा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    अविनाश दिलीप गोणेकर (रा. मल्लाप्पा धनशेट्टी रोड, बार्शी ) यांची घरासमोर हॅण्डल लॉक करून लावलेली करिझ्मा मोटारसायकल रविवार दि.१ मार्चच्या रात्री ते सोमवार दि.२ च्या पहाटेच्या दरम्यान चोरीला गेली होती. त्यांनी शहर पोलीसांत याबाबत फिर्याद दिली होती.

    सदर मोटारसायकल चोरीचा तपास करत असताना पोलीसांना संशयिताबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरच्या दोघांना टेंभुर्णी येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलीसांनी चोरीला गेलेली सदर करिझ्मा मोटारसायकलसह अन्य दोन एच एफ डिलक्स मोटारसायकली जप्त केल्या आहेत. संशयितांना अटक करण्यात आली असून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

    पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार, सहायक फौजदार अजित वरपे, हवालदार सहदेव देवकर, अमोल माने, सचिन आटपाडकर, गणेश दळवी, चंद्रकांत आदलिंगे, सय्यद यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस नाईक गणेश दळवी करत आहेत.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur