मृतदेहाला अंघोळ घालणे व पाणी पाजले पडले महागात तब्बल 23 जणांना झाली कोरोनाची लागण

0
274

उल्हासनगर : कोरोना रुग्णाच्या अंत्यविधीला हजेरी लावणाऱ्या पैकी 23 जनाला कोरोनाचा संसर्ग झाला. तर अनेकांचे स्वॉब अहवाल येण्याचे बाकी आहे. या प्रकाराने हिराघाट परिसरात भीतीचे वातावरण असून सदर घटना गेल्या आठवड्यात घडली. त्यामुळे या भागाचे कंटेन्मेंट झोनमध्ये रूपांतर झाले आहे. 

असाच प्रकार गेल्या महिन्यात खन्ना कंपाऊंड परिसरात घडली होती. उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट परिसरात राहणारा ४५ वर्षाचा इसम एका खासगी वाहनावर चालक असल्याने त्याचे मुंबईला येणे जाणे होते. गेल्या आठवड्यात त्याला चक्कर येऊन रस्त्यावर पडल्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात नेऊन मृत्यू पश्चात रुग्णालयाने त्याचा स्वॅब घेतला. तसेच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना कोरोना रुग्ण प्रमाणे बांधून दिला. अंत्ययात्रेत जास्त जणांनी सहभागी होऊ नये. बांधलेला मृतदेह उघडू नये. असे रुग्णालयाने नातेवाईकांकडून लिहून घेतले. असे असतानाही नातेवाईकांनी मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवून, अंत्ययात्रेत अनेक जण सहभागी झाले.

स्मशाभूमीत पाणी पाजण्यासाठी मृतदेह उघडण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिराघाट परिसरात एकच खळबळ उडाली. महापालिका आरोग्य विभागाने ७० पेक्षा जास्त जणांना विलगीकरण करून अनेकांचे स्वॉब घेतले. त्यापैकी 23 जणांला कोरोनाचा संसर्ग झाला. तर अनेकांचे अहवाल येणे बाकी आहे.

यापूर्वी याच परिसरातील खन्ना कंपाऊंडमध्ये अशाच प्रकार घडला असून, अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पैकी २५ पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. मध्यवर्ती रुग्णालयाने मागचा प्रकार विचारात घेऊन मृतदेह पोलीस व महापालिका कर्मचारी समक्ष नातेवाईकांच्या ताब्यात दिला असता तर, असा पुन्हा प्रकार घडला नसता. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

या खन्ना कंपाऊंड येथे असा प्रकार घडल्यानंतर, तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संशयित कोरोना रुग्ण मृतदेह परस्पर नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन व पालिका प्रभाग समितीला द्या. असे पत्र रुग्णालयाला दिले. मात्र त्यानंतर असे प्रकार मध्यवर्ती रुग्णालयाकडून वारंवार घडत असल्याने रुग्णालयाच्या प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे, खन्ना कंपाऊंड प्रकरणी मृत व्यक्तीच्या तिघा नातेवाईकावर पालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता.

कोरोना संशयिताचा अहवाल आल्याशिवाय मृतदेह देऊ नये
मध्यवर्ती रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असेल तर, कोरोना अहवाल आल्या शिवाय त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊ नये. अशी विनंती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मध्यवर्ती रुग्णालयासह इतर रुग्णालयांना केले. महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणावरून तसा लेखी आदेश काढण्याची मागणी चौधरी यांनी केली.

दरम्यान संपर्कातील अद्यापही काही जणांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. येथे जाण्यास बाहेरच्या नागरिकांना बंदी आहे. मात्र रोज साफसफाई करण्यासाठी येणारे 10 कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या सर्वांना पीपीई किट्सचे कवच देण्यात आल्याची माहितीही शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur