मुख्यमंत्र्यांविरोधात बदनामीकारक मजकूर ; भाजपच्या सोशल मीडिया सेलवर गुन्हा दाखल

0
416

मुख्यमंत्र्यांविरोधात बदनामीकारक मजकूर ; भाजपच्या सोशल मीडिया सेलवर गुन्हा दाखल

पुणे – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याप्रकरणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकासआघाडी विरोधात महाराष्ट्र भाजपा वाॅररुममधील मिडिया सेलच्या वतीने आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता.

या मजकुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ‘मुख्यमंत्री झाला, कोरोना आला. खराब पायगुण, पणवती’ अशा आशयाचा मजकुर टाकून बदनामी केली असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला होता.

पाटील यांनी त्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पुणे सायबर शाखेने भारतीय दंड संहितेच्या कलम 500 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur