मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी, वाचा कोणी केली ही मागणी

0
273

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी, वाचा कोणी केली ही मागणी

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी, वाचा कोणी केली ही मागणी

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुरज गायकवाड

ग्लोबल न्यूज: लॉकडाऊन जर असाच सुरू ठेवला तर दिवसेंदिवस अर्थव्यवस्थेची हालत बिकट होईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी, असे मत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सकाळ या वृत्त समूहाने याबाबतची बातमी दिलेली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये म्हणून 4 थ्या टप्याच्या लॉकडाऊनची घोषणा काही दिवसात होणार आहे. हा लॉकडाऊ शिथील करण्याबाबत अनेक मतं-मतांतर आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला लॉकडाऊन शिथील करण्याची वेळ आली आहे, असे मत फडणवीस यांनी मांडले आहे.

राज्याच्या विकासाचा आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी महाविकास आघाडीला हिंमत दाखवून लॉकडाऊन शिथील करावा लागेल नाहीतर राज्याची अर्थव्यवस्था विस्कळीत होण्यास वेळ लागणार नाही असे फडणवीस यावेळी म्हणाले. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या भीतीने बचावात्मक पवित्रा घेतला तर राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात येईल. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आणि महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन शिथील करावा, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur