मुख्यमंत्री स्वतःच बनले “सारथी”

0
435

स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री पोहचले मनपा कार्यालयात

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुरज गायकवाड

मुंबई:कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन संपूर्ण देशात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. यात लॉक डाऊन दरम्यान सर्व जनतेला राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आता या नियमाचे कडेकोठ पालन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. आज कोरोना संदर्भात मुख्यमंत्री घेत असलेल्या बैठकांमध्ये त्यांच्या सोबत उपस्थित असलेले मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी याच नियमाचे पालन करताना दिसून येत आहे. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय, वर्षां बांगला आणि मनपा कार्यालयात दररोजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा सिलसिला चालूच आहे.

  त्यातच मुख्यमंत्र्यांनी आपल्या ड्रायव्हरला सुट्टी देऊन स्वतः गाडी चालवत आपल्या वाहनाचे सारथी बनले. कोरोना संदर्भात मनपा कार्यालयात मनपा आयुक्तांसोबत आयोजित केलेल्या बैठकीला जाताना मातोश्री या आपल्या घरातून स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री मनपा कार्यालयात पोहचले होते.  या गाडीत मागच्या सीटवर पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे बसले होते.

गाडीत एकत्र बसलेले असताना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकमेकात सुरक्षित अंतर राखून बसले होते. सध्या दोन दिवसाआड मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी फेसबूकच्या माध्यमातून संवाद साधत स्वतःची आणि परिवाराची कायजी घेण्याच्या सल्ला जनतेला देत आहे.

  हाच मुख्यमंत्र्यांचा साधेपणा पाहून मनपा कार्यालयातील कर्मचारी वर्ग सुद्धा भारावून गेला होता. सध्या राज्यात जीवनावश्यक वस्तूची दुकाने 24 तास खुली ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे परंतु या काळात सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असेल अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur