मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विधी सल्लगारपदी बार्शीपुत्र आरगडे

    0
    254

    मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विधी सल्लगारपदी बार्शीपुत्र आरगडे

    बार्शी – मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी बार्शीपुत्र आणि नामांकित विधीज्ञ एड. जीवनदत्त आरगडे यांची नियुक्ती झाली आहे. पत्रकार संघांचे अध्यक्ष नरेंद्र बावळे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सन्मान केला. बार्शीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    मुंबई मराठी पत्रकार संघ ही सर्वात जुनी आणि नोंदणीकृत पत्रकार संघटना आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या संघांचे सदस्य होते. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हेही या संघटनेचे विद्यमान सदस्य आहेत. सन १९४१ पासून कार्यरत असलेला एकमेव पत्रकार संघ म्हणून याची ओळख आहे. बार्शीतील काँग्रेस नेते आणि विधीज्ञ जीवनदत्त आरगडे हे सध्या मुंबईत कार्यरत आहेत. मुंबईतील न्यायालयात ते कामकाज करतात. त्यासोबतच बार्शीतील राजकारणातही सहभागी असतात. बार्शीतील दैनंदिन प्रश्नावरही ते नेहमीच आवाज उठवतात.

    अरगडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल बार्शी आणि विधी क्षेत्रातील मित्र परिवार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur