मुंबईहुन आलेला व्यक्तीच निघाला कोरोना पॉझिटिव्ह-पालकमंत्री दत्ता भरणे

0
282

घेरडी गावात बारामती पॅटर्न राबविण्याच्या केल्या सुचना

राजेंद्र यादव

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सांगोला – तालुक्यातील घेरडी येथे एकाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी रविवारी सकाळी घेरडी या गावाला भेट दिली. त्यानंतर सांगोला येथे आढावा बैठक घेऊन घेरडी गावात बारामती पॅटर्न राबविण्याच्या सुचना केल्या आहेत.

सांगोला तालुक्यातील घेरडी येथे मुंबईहून आलेल्या एकास त्रास होऊ लागल्यामुळे त्यास शुक्रवारी सोलापूरला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना चा शिरकाव झाल्याचे दिसून आले. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत घेरडी गाव व परिसरात तीन किलोमीटर रस्ते सील करून विविध उपाययोजना सुरू केल्या.

यासंदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी रविवारी सकाळी घेरडी गावास भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकारी व गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सांगोला येथील अहिल्यादेवी होळकर सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

यावेळी घेरडी गावात बारामती पॅटर्न राबविण्यात यावा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. त्याचबरोबर सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २० जणांना सोलापूर येथे तपासणीसाठी पाठविल्याचेही सांगितले. यापुढे या परिसरात पुन्हा रुग्ण वाढणार नाहीत यासाठी दक्षता घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

या आढावा बैठकीला आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह मंगळवेढाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, सोलापुरचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, तहसिलदार योगेश खरमाटे, सभापती सौ. राणीताई कोळवले, गटविकास अधिकारी संतोष राऊत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे तसेच सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur