मुंबईत आज पासून सुरू होणार या गोष्टी वाचा

0
381

मुंबईत आज पासून सुरू होणार या गोष्टी वाचा

मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली मुंबईत हळू-हळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत दुकाने उघडण्यासाठी काही अंशतः सूट देण्यात येत आहे. मात्र बाजारपेठा, दुकानं सुरु होणार असली तरी तिथे आता आपल्याला पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. तसेच सर्व नियमांचे काटेकोडपणे पालन करावे लागणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
  • मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून घेण्यात आली आहे.
  • आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता विनापरवानगी प्रवास करता येईल.

-पहाटे पाच ते रात्री सात या वेळेत नागरिकांसाठी उद्याने, मैदाने खुली करण्यात आली आहेत. यावेळेत नागरिक व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात मात्र गर्दी न करता या गोष्टी कराव्या लागणार आहे.

-दुकान सम-विषम नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील. नियमांचं पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट मध्ये या विषयी चर्चा करावी.

  • कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur