मुंबईतील हा भाग असणार 100 टक्के लॉकडाऊन, महापौरांची माहिती
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: मुंबईतील हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाणारे वरळी आणि डिलाईल रोडवरील बीडीडी चाळ पुढील आठ दिवस १०० टक्के लॉकडाऊन असणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी ह्या बाबत पत्रकार समूहाला माहिती दिली आहे.

कोरोना संसर्ग आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून यांसदंर्भात महापौरांनी पोलीस प्रशासनाला पत्र दिले आहे. लॉकडाऊनच्या काळातही या परिसरात गर्दी कमी होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
वरळी भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून मागील काही दिवसापासून रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यात काही अंशतः मृत्युचे प्रमाण ही वाढताना दिसत आहे. त्यातच सर्रास लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यास अपयश येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता येथील कोरोनाची साखळी मोडण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मुंबईत वाढत आहे. त्यामुळे हॉटस्पॉट असणारा वरळीचा भाग आणि डिलाईल रोडवरील बीडीडी चाळीत आता पुढील आठ दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे.