मी पक्षासाठी काम करत असताना आताचे नेते चड्डीत मुतत होते-एकनाथ खडसे

0
297

मी पक्षासाठी काम करत असताना आताचे नेते चड्डीत मुतत होते- खडसे


ग्लोबल न्यूज: भाजपा पक्षाने विधान परिषदेवर संधी दिल्याने नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा नेत्यांच्या विरोधात चांगलेच दंड थोपटले आहे. आपली नाराजी एकनाथ खडसे प्रसार माध्यमांसमोर येऊन बोलून दाखवत आहेत. मला जाणून बुजून पक्षातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी जेव्हा पक्षासाठी काम करत होतो तेव्हा पक्षातले काही जण चड्डीत मुतत होते, असा टोला खडसे यांनी लगावला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे यांनी भाजपाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमधील काही व्यक्ती मला जाणीवपूर्वक बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून अशा स्वरूपाचा छळ सुरू आहे. मात्र पक्षाच्या ध्येय धोरणांशी आणि निष्ठेशी प्रामाणिक राहिलो आहे.

पक्षामध्ये मी ज्यावेळी कामाला सुरूवात केली. आताचे नेते तेव्हा अर्धी चड्डी घालून, तर काहीजण चड्डीसुद्धा घालत नव्हते. काहीजण चड्डीत मुतायचे अशी स्थिती होती. आम्ही तेव्हापासून काम करत आहोत. अशा स्थितीत ज्या पक्षाशी आमची आपुलकी आहे. बांधिलकी आहे. त्यामुळे एकाएकी पक्ष सोडणं हे मला पटणार नव्हते.

आजही हजारो कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहे की, कशासाठी पक्षामध्ये राहत आहात. लोकांची भावना बदलत चालली आहे, पण मी पक्षाच प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी हे सहन करत आलो आहे. पण, यालाही काही मर्यादा आहेत,” अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली. त्यामुळे
लॉकडाऊन नंतर खडसे काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur