माधवबाग उस्मानाबादला सर्वोत्तम नवीन शाखेसह दोन पुरस्कार 

  0
  284

  बार्शी: हृदयरोगावर विनाशस्त्रकिया आयुर्वेदिक उपचारांसाठी अग्रगण्य असणाऱ्या माधवबाग संस्थेचा  वार्षिक पुरस्कारवितरण सोहळा नुकताच नवी मुंबई येथे पार पडला. भारतातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश ई. राज्यांमध्ये संस्थेचा 240 पेक्षा अधिक शाखांचा विस्तार आहे. 
  गतवर्षी नव्याने सुरु झालेल्या एकूण क्लिनिक्सपैकी उस्मानाबाद शाखा हि  विभागातील सर्वोत्तम ठरल्यामुळे शाखेचा ‘द बेस्ट न्यू क्लिनिक’  या पुरस्काराने कार्यक्रमामध्ये  गौरव करण्यात आला. क्लिनिकमधून दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधा,रुग्णांचा प्रतिसाद व त्यांच्या त्रासामधील सुधारणा इ.अनेक निकषांवर हा पुरस्कार दिला गेला. 
  उस्मानाबादसारख्या ग्रामीण व मागास भागात मोठ्या  शहरांप्रमाणेच उत्तम आरोग्यसेवा पुरविल्यामुळे माधवबागचे संस्थापक डॉ. रोहित साने यांनी यावेळी उस्मानाबाद शाखाप्रमुख डॉ. पवन कोळी तसेच कर्मचारीवृंद डॉ. दिपाली इंगळे,  मनीषा कुलकर्णी, सोमेश्वर कांबळे, श्वेता कुलकर्णी, अजय मुसळे, जयश्री कांबळे, प्रियांका चाकवते यांचे अभिनंदन केले. 

  डॉ. पवन कोळी यांचा ‘बेस्ट इंप्रूव्हमेन्ट इन डायबेटीस’ या  विशेष पुरस्काराने सन्मान केला गेला. मधुमेही रुग्णांच्या त्रासांमध्ये झालेल्या  सुधारणेसाठी हा पुरस्कार दिला गेला.   
  हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा इ.आजारांवर भविष्यातदेखील सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे यावेळी डॉ. पवन कोळी यांनी सांगितले तसेच पदार्पणातच क्लिनिकला दोन पुरस्कार मिळाले त्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. 
  पुरस्कारवितरण सोहळ्याप्रसंगी बार्शी शाखाप्रमुख डॉ. क्रांती कोळी, डॉ. सचिन पाटील, श्री. शीतल महाजन, सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि माधवबागच्या सर्व शाखांमधून 650 पेक्षा अधिक डॉक्टर्स उपस्थित होते

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  Best IT Comany In Maharashtra , Solapur