महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काम करणारे अनुभव सुखावणारे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
584

महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काम करणारे अनुभव सुखावणारे – अजित पवार

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं योगदान महत्त्वाचं..

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शिवसेना पक्ष आज आपला ५४ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन ! महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्त्वाचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज, महाविकास आघाडीत आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे, असं पवार म्हणाले आहेत.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना सोबत घेत १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. आजवर शिवसेना पक्षाने अनेक चढउतार पहिले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत युतीमध्ये असणारी शिवसेना आज कॉंग्रेस – राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करत सत्तेतील प्रमुख पक्ष बनला आहे.

पक्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्तींनी निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विजय मिळवला. तर निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय महानाट्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारर्किदीत एकदाही निवडणूक लढवली नव्हती. त्यानतर आता उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर बिनविरोध झाली आणि ते सुद्धा आमदार झाले. त्यामुळे ठाकरेंच्या घरात दोन व्यक्ती ते सुद्धा पितापुत्र एकाचवेळी विधीमंडळाचे सदस्य झाल्यानं ठाकरे घराण्यात एका वेगळ्याच इतिहासाची नोंद झाली आहे

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here