ग्लोबल न्यूज – राज्यात आज कोरोनाचे 2361 नवे रूग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात आता एकूण रूग्णसंख्या 70,013 वर पोहोचली आहे. राज्यात आज 76 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 2362 वर पोहोचला आहे.

राज्यात आज झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे जिल्ह्यातील 60, नाशिक जिल्ह्यातील 1, पुणे जिल्ह्यातील 9, औरंगाबाद जिल्ह्यातील 4, लातूरमधील 1 तर नागपूरमध्ये 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 779 करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 30 हजार 108 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 37 हजार 534 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात 5,67,552 लोकं होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत, तर 39189 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. राज्यात आजवर केलेल्या 4 लाख 71 हजार 573 रुग्णांच्या चाचण्यांपैकी 70 हजार 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर इतरांचे निगेटिव्ह आले आहेत.
राज्यातील लाॅकडाऊन हळूहळू शिथिल करत आपल्याला नव्याने सुरूवात करायाची असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल म्हणाले. राज्यात 3 व 5 जूनपासून लाॅकडाऊनचे नियम शिथिल केले जाणार आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार जुलै महिन्यात कोरोना रुग्णांचा ‘पीक’ दिसून येऊ शकतो.