महात्मा गांधी अन बार्शी ; बार्शीच्या सभेत गांधीजींनी दिला होता स्वदेशी वापराचा नारा,वाचा सविस्तर-

    0
    416

    महात्मा गांधी अन बार्शी ; बार्शीच्या सभेत गांधीजींनी दिला होता स्वदेशी वापराचा नारा,वाचा सविस्तर-

    बार्शी – १९२१ मध्ये महात्मा गांधी बार्शी मध्ये आले होते.बार्शीमध्ये त्यांची जाहीर सभाही झाली होती.या सभेत ते बार्शीत २५ चरखे चालू असल्याचा व ते सूत मुंबईच्या बाजारपेठेत जात असल्याचा उल्लेख करतात.पण ते आव्हान करतात जर सर्व गोरगरीब सामन्यांना आर्थिक सक्षम व्हायचे असेल तर त्याने चरखा चालवावा.याच सभेत गांधीजींनी स्वदेशी वापरायचा हि नारा बार्शीकरांना दिला होता.

    या सभेला वैरागजवळील दहिटणे मधील स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव जे पुढे ज्येष्ठ नेते व आमदार बनले २१ किलोमीटरचे अंतर चालत आले होते.गांधीजींचे भाषण त्यांनी मन लावून ऐकले.प्रचंड जनसमुदायातील प्रत्येक श्रोता भाषणाने गहिवरला होता.मातृभूमीच्या स्वातंत्र्यसाठी काहीतरी करायचे हि बीजे या सभेत तुळशीदासांच्या मनात रुजली गेली.या नंतर वैरागला परतल्यानंतर त्यांनीं आपल्या मास्तरकीचा राजीनामा दिला.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    महात्मा गांधी १९२१ मध्ये आपल्या नवजीवन या वर्तमानपत्रात लिहतात कि “बार्शीमध्ये एकच सूतगिरणी आहे.या मिलचे मालक श्री.यशवंतराव देसाई आहेत.ते प्रत्येक सामाजिक कार्यात भाग घेतात.ते स्वतः खादी परिधान करतात.चरख्याच्या प्रसारामध्ये त्यांनी स्वतःला वाहून दिले आहे.”

    १९४२ मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जाव म्हणत करो या मरो हि घोषणा दिली,कर्मवीर जगदाळे मामा गांधीजींच्या या नेतृत्वाने भारावले गेले.ते दररोज विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसंग्रामाच्या गोष्टी सांगत.११ ऑगस्ट १९४२ रोजी बोर्डिंगचे काही विद्यार्थी गोविंदराव बुरगुटे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र जमले.सुंदर नलावडे,रंगनाथ गवळी,दत्तात्रय पाटील,केशव घुटे यांनी तिरंगे झेंडे हाती घेतले.भाषणबंदी,प्रचारबंदी मोडून काढत त्यांनी पांडे चौकातून मिरवणूक सुरु केली.”भारत माता कि जय ..महात्मा गांधी कि जय” या घोषणांनी पांडे चौक दणाणून निघाला.या सर्व विद्यार्थ्यांना विजापूरच्या तुरुंगात ३ महिन्यासाठी टाकण्यात आले होते.

    १९४८ मध्ये महात्मा गांधीजींची हत्या झाली.गांधीजींचा अस्थिकलश बार्शी मध्ये आणण्यात आला होता.हा कलश बार्शीचे तत्कालीन आमदार भगवंतराव कथले, शिवाजी वायकर व गंगाधर झाडबुके यांनी स्वीकारला होता.उत्तरेश्वर मंदिरात असणाऱ्या विहिरीमध्ये गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

    लेखन – अजिंक्य गायकवाड

    संदर्भ:
    Collected Works Of Mahatma Gandhi
    कर्मवीर जगदाळे मामा जीवनचरित्र
    महाराष्ट्राचे शिल्पकार तुळशीदास जाधव

    Best IT Comany In Maharashtra , Solapur

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here