“मला, फडणवीसांना नाव ठेवता ते चालत, पडळकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे मत
शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असे वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीकेले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून बारामती येथे पडळकरांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. मात्र आता गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


गोपीचंद पडळकर समजूतदार कार्यकर्ते आहेत, शरद पवारांबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिलं नाही, हा पडळकर यांचा अनुभव असेल. अनादर व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. फडणवीस यांनी शब्द जपून वापरण्याची समज पडळकर यांना दिली आहे,
‘ पुढे बोलताना पाटील म्हणाले की,
‘महाराष्ट्रात चाललंय काय? माझ्याबद्दल कोणीही काहीही बोलतं. फडणवीस आणि मलला कुठलीही टोपण नावं ठेवतात, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही अग्रलेखात काय लिहिता? , तुमच्या अग्रलेखाची भाषा काय असते?’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी सेनेला लगावला.