अस्थिर जगात मनाला स्थिर करण्यास ब्रहमाकुमारी विद्यालयाचे शांतीदानाचे कार्य महत्वपूर्ण : आमदार राजाभाऊ राऊत

बार्शी : ‘आज जगाला शांततेची गरज आहे. योग साधनेद्वारे मन शांत होते’. असे प्रतिपादन आमदार राजाभाऊ राऊत यांनी केले. ते येथील प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात महाशिवरात्री निमित्त आयोजित शिवध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते.
सात मिनिटाच्या गाइडेड मेडिटेशन मधील अनुभूतींनंतर ते पुढे म्हणाले, ‘ या प्रकारे दररोज पाच मिनीट शांतीचा अभ्यास करणे हा माझ्या दैनंदिन सकाळच्या दिनचर्येत नित्याचा भाग आहे. आजच्या अस्थिर जगात मनाला स्थिर करण्यास ब्रहमाकुमारी विद्यालयाचे शांतीदानाचे कार्य महत्वपूर्ण आहे. जगात प्रत्येक जण आपापल्या कार्यात व्यस्त आहे. परंतू ही सर्व कामे संपल्यानंतर प्रत्येकाला ब्रहमाकुमारी विद्यालयतच यावे लागेल. कारण या ठिकणीच मन शांत व स्थिर होते. जागतिक पातळीवर सुरू असलेले विद्यालयाचे कार्य संगीतबहनजींनी बार्शी तालुक्यात चांगल्या प्रकारे रुजवले असल्याचे ते म्हणाले.


महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करताना बार्शी सेवाकेन्द्र संचालिका संगीतबहनजी म्हणल्या, ‘ ईश्वर एक असून त्याचे नाव शिव आहे. त्या निराकार शिवाच्या अवतरण प्रित्यर्थ आपण महाशिवरात्री साजरी कऱतो. शंकर सूक्ष्मधारी देवता असून शिव हा परमात्मा आहे. म्हणून आपण आजच्या उत्सवाला शंकररात्री न म्हणता शिवरात्री म्हणतो. शिव परमात्मा आपणास अवगुणांचा उपवास म्हणजे त्याग करण्यास शिकवतो. दैवी गुण धारण केल्यास जीवन सुखी बनेल व भारत सुखधाम स्वर्ग बनेल.

यावेळी लायन्स क्लब बार्शी रॉयल चे अध्यक्ष संतोष गुळमिरे व सोनल गुळमिरे , सहाय्य्क पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्री, डॉ. विक्रम निमकर, प्रा. सुनिल विभूते, एलआयसी चे शाखा व्यवस्थापक संजय बारसकर, कुंडलिकरव गायकवाड, बाबासाहेब मोरे महादेवी बहनजी, मीराबहनजी हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘ मुश्किलों को प्रभू अर्पण कर दो तो हर मुश्किल सहज हो जाएंगी ‘ या सुविचारचा फलक, शाल देवून राजाभाऊ राऊत यांचा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या उपस्थित शिवध्वजारोहण संपन्न झाले. मोहनभाई बुचडे यांनी आभार मानले . अनिताबहन करवा यांनी सूत्रसंचलन केले.