मद्यप्रेमीसाठी खुशखबर,सरकारने घेतला हा निर्णय ; वाचा सविस्तर-

0
271

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी पासुन सुटका व्हावी म्हणून इ – टोकन सुविधा उपलब्ध केली असतानाच आता मद्यप्रेमींना दुसरा सुखद धक्का दिला आहे.मद्य विक्रीच्या दुकानातील गर्दी कमी करण्यासाठी आता घरपोच दारू मिळणार आहे.तसे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केले आहेत.

सध्या राज्यात मुंबई शहर,मुंबई उपनगर,उस्मानाबाद व लातुर वगळता इतर ठिकाणी वाईन शॉप मधून मद्य विक्री सुरू आहे.तर मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईन शॉप मध्ये होणा-या गर्दी पासुन सुटका व्हावी आणि कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार होवू नये यासाठी कालच इ – टोकन सुविधा उपलब्ध करून दिली असून, आता टाळेबंदीच्या कालावधीत वाईन शॉप मालकांना ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यासंदर्भातील आदेश आज जारी करण्यात आले आहेत.त्यानुसार अटी आणि शर्थीचे पालन करून भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, बीअर,सौम्य मद्य,वाईनची विक्री परवानाधारकास त्यांच्या निवासी पत्तावर घरपोच देण्यात येणार आहे.यासाठी परवानाधारकास मद्यासाठी मागणी नोंदविणे आवश्यक आहे.त्यानंतर संबंधित वाईन शॉपचा मालक मद्याची घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली आहे.अशी व्यक्ती संबंधित ग्राहकांच्या पत्त्यावर मद्य पोहच करणार आहे.

अशी घरपोच सेवा देणा-या व्यक्तीला मास्कचा वापर व वेळोवेळी हाताचे निर्जंतूकीकरण करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.सध्या सुरू करण्यात आलेली घरपोच मद्य विक्रीची सेवा राज्यात टाळेबंदी असे पर्यंत सुरू राहणार आहे.आज जारी करण्यात आलेल्या आदेशात बदल अथवा ते रद्द करू नयेत असेही नमुद करण्यात आले आहे.

ज्या वाईन शॉप मालकाला भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, बीअर,सौम्य मद्य,वाईनची विक्री करण्याचा परवाना आहे अशा मद्य विक्रेत्यांनाच ग्राहकांना घरपोच मद्य पोहवण्यास परवानगी देण्यात आली आहे.विहीत केलेल्या दिवशी आणि वेळेतच विदेशी मद्याची विक्री व वितरण केवळ वाईन शॉप मालकाच्या आवारातूनच करता येणार आहे. या निर्णयामुळे मद्यप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच वाईन शॉपच्या बाहेर होणारी गर्दी अटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur