मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनीच घेतली पोलीस आणि पत्रकारांची काळजी

0
262

ठाणे येथील कोरोना तपासणी शिबिरात इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकार आणि पोलिसांनी केली तपासणी

पत्रकार आणि पोलिसांसाठी पार पडले 10 वे शिबीर, आजपर्यंत 750 पत्रकार – पोलीस बांधवांची तपासणी

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पत्रकार आणि पोलिसांनी मानले खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार

positive आढळलेल्या पत्रकारांना कोविड हॉस्पिटलमध्ये योग्य उपचारासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठपुरावा

ठाणे ( प्रतिनिधी ) राज्याचे नगरविकास मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबई शहर आणि उपनगरांत फिल्ड वर कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. NABL & ICMR मान्यता असलेल्या कृष्णा डायगोस्टिक या खाजगी लॅब द्वारे कोरोना SWAB तपासणी करण्यात आली. याचे अहवाल आज येणार आहेत.

शनिवारी दुपारी ठाणे विश्रामगृहाच्या आवारात पार पडलेल्या या शिबिरात एकूण 18 पत्रकारांची आणि 4 पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरांतील वृत्तांकन करणाऱ्या सर्व खाजगी वृत्तवाहिनीमधील पत्रकार , कॅमेरामन, वृत्त निवेदक यांचा समावेश होता.

दरम्यान, आजपर्यंत एकूण 10 शिबिरांत एकूण 750 पत्रकार आणि पोलिसांच्या कोरोना तपासणी चाचण्या झाल्या असून या तपासणीत 20 पत्रकार positive आढळले आहेत.

या पत्रकारांना कोविड हॉस्पिटलमध्ये योग्य उपचारासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur