कोरोनाच्या संकटामुळे भेंडवळची घट मांडणी यंदा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या आग्रहावरून अखेर अक्षय तृतीयेला रविवार 26 एप्रिल रोजी सायंकाळी वाघ कुटुंबियातील दोघांनी त्यांच्या शेतात जाऊन परंपरेप्रमाणे मांडणी केली. 27 एप्रिल रोजी सकाळी भाकीत वर्तविण्यात आले. त्यानुसार पाऊस सर्वसाधारण व चांगला असे वर्तवण्यात होते. सध्याची मान्सूनची गती पाहता, भेंडवळच्या भाकिताप्रमाणे पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे.

भेंडवळच्या यंदाच्या भाकितानुसार देशात आर्थिक संकट राहणार आहे. रोगराई सुद्धा असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी होण्याची शक्यता देखील असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार एप्रिल – मे दरम्यान बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झाला.

मांडणीची पाहणी करताना घटावरील पुरी पूर्णपणे गायब असल्याने पृथ्वीवरील संकट कायमच राहणार असे भाकित वर्तवण्यात आले. तर करंजी सुद्धा गायब दिसल्याने अर्थव्यवस्था कोलमडली राहणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. भादली नावाचे धान्य हे विखुरलेले दिसले, त्यामुळे माणसावर आणि पिकांवरही या वर्षात रोगराईचे संकट राहणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तवले.