भूम – तालुक्यातील वंजारवाडी पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे विद्यमान सदस्य बाजीराव तांबे यांचा धारधार शस्त्राने निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. देवळाली गावात ही घटना घडली असून गावातील ग्रामपंचायत समोरच हा खून करण्यात आला आहे.

गावातील शिवारस्त्यावरून त्यांच्या भावकीमध्ये गेले अनेक दिवस वाद सुरू होता. या संबंधी पोलिस स्टेशन व महसूल विभागात तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या, त्याची चौकशी चालू असतानाच काल रात्री मयत बाजीराव तांबे व मुख्य आरोपी यांच्यात पुन्हा वाद झाला व या वादात बाजीराव तांबे यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले. पुढील उपचारासाठी बार्शी हलवण्यात आले असता मयत म्हणून घोषित करण्यात आले.

प्रकरण काय?
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील देवळाली गावात ही घटना घडली असून गावातील ग्रामपंचायती समोरच त्यांची हत्या केली. गावातील शिवारस्त्यावरून या बाजीराव तांबे आणि त्यांच्या चुलत भाऊ चंद्रकांत तांबे यांच्यात गेली अनेक दिवस वाद सुरू होते. या प्रकरणी दोन्ही गटाकडून पोलिसांत व महसूल विभागात तक्रारी देखील केल्या होत्या. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू होती.
उस्मानाबाद लाईव्ह
साभार