भारतीय स्टेट बँकेची नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलला 10 लाखांची मदत

  0
  204

  भारतीय स्टेट बँकेची नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलला 10 लाखांची मदत


  बार्शी, (प्रतिनिधी)-

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  बार्शीतील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला भारतीय स्टेट बँकेच्यावतीने सीएसआर फंडातून 6 लाख रुपयांचा धनादेश व 4 लाख रुपयांचे साहित्य अशी 10 लाख रुपयांची देणगी सुपूर्द करण्यात आली.  यावेळी भारतीय स्टेट बँकेचे गोवा आणि महाराष्ट्राचे प्रमुख व्यवस्थापक जी. रवींद्रनाथ, उपव्यवस्थापक आबीद रहेमान, सोलापूर विभागाचे सहा. व्यवस्थापक अमेय तिवारी यांनी हा धनादेश हॉस्पिटलचे कार्याध्यक्ष माजी आ. दिलीप सोपल यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी हॉस्पिटलचे सचिव सत्यनारायण झंवर, खजिनदार बन्सीधर शुक्ला, संचालक बाबासाहेब कथले, मनीष चौहान, गाडेकर, अशोक डहाळे, मदनसिंह चौहान आदी उपस्थित होते.

  यावेळी बोलताना जी. रवींद्रनाथ रांनी या हॉस्पिटलमुळे अनेक रुग्णांची सोय झाल्याचे सांगत अशा सेवेला बँकेचा हातभार लागावा यासाठी आम्ही ही मदत दिल्याचे सांगितले. दिलीप सोपल म्हणाले, डॉ. नेने हे आमच्रा टीमचे कॅप्टन होते. आज  आमच्याकडे असलेल्या मशीनला 10 वर्षे झालेले आहेत. त्यामुळे अद्यायावत मशीन घ्यवी लागणार आहे. बँकेचे व आमच्या हॉस्पिटलचे स्थापनेपासूनच  ऋणाबंध आहेत. त्यामुळे हॉस्पिटलच्या प्रगतीसाठी बँकेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यानी केले.

   प्रास्ताविकात संचालक मदनसिंह चौहान यानी हॉस्पिटलच्या वाटचालीचा व डॉ. नेने यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन हिंगमिरे रांनी केले तर आभार बन्सीधर शुक्ला यानी मानले.  यावेळी डॉ. हरीराम गडदे व डॉ. प्रकाश ढाळे याचा जी. रवींद्रनाथ रांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur