नवी दिल्ली | आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास 25 हजारांवर पोहोचली आहे. माहितीनुसार आतापर्यंत देशात 24 हजार 942 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
यापैकी 5 हजार 210 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात भारतात 1490 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 56 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत या आजाराने देशाभरात मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 779 इतकी झाली आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. मात्र तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं बघायला मिळालं आहे. लॉकडाऊनमुळं देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात बिघडली आहे. अर्थव्यवस्थेला परत रुळावर आणण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न केले जात आहे.