जालना : औरंगाबादमधील महावितरणच्या अभियंत्याला शिविगाळ केल्याच्या कारणावरुन लोणीकरांविरुध्द जालना पोलीसात Atrocity चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी जालना पोलिसा लोणकर यांच्याविरुध्द तक्रार दिली होती.
लोणीकर यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील ‘आमचे काय मिटर काढता? झोपडपट्टीवर जाऊन आकडे काढा’ लोणीकरांच्या या वक्तव्यामुळे दलितांचा अवमान झाला असून माझ्याही भावना दुखावल्या गेल्याची तक्रार घेवंदे यांनी केली होती.

या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
औरंगाबाद शहरातील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोन कार्यकर्त्यांनीही लोणीकर यांच्याविरोधात औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयात Atrocity ची तक्रार दिली आहे.
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या औरंगाबाद येथील बंगल्याचे साडेतीन लाख रुपये वीजबील थकले होते. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंगल्याचे कनेक्शन तोडले, त्यामुळे संतप्त झालेल्या लोणीकरांनी अधिकाऱ्यांना फोनवरुन शिवीगाळ केली होती, आणि ती ऑडिओ क्लिप सोशल मिडियातून व्हायरल झाली होती.