भाजपाच आंदोलन झालं फेल…! वाचा सविस्तर-

0
264

भाजपाच आंदोलन झालं फेल…! वाचा सविस्तर-

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज:सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्नाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र राज्यावर आलेल्या संकटात सुद्धा भाजपाने आपले राजकारण सुरू ठेवत महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी “मेरा आंगण मेरा रणांगण” ह्या बोध वाक्याचा आधार घेत आंदोलनाचे हत्यार उपसले होते मात्र त्यांच्या ह्या आंदोलनामुळे भाजपाच्या नेत्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. भाजपचे आंदोलन ट्रोल – नेटकऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सडकवून धुतले.

मात्र आजच्या आंदोलनाकडे कार्यकर्ते आणि भाजप समर्थकांनी आजच्या आंदोलनाकडे पाठ फिरवत घरामध्ये राहूनच एकंदरीत महाराष्ट्रात होणारी आंदोलनाची मजा बघण्यास पसंत केले. काल पाटील यांनी आवाहन करताच नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता संपूर्ण सोशल मीडियावर या आंदोलनाची खिल्ली उडवण्यास नेटकऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच #महाराष्ट्रद्रोही असा एक हॅशटॅग देखील नेटकऱ्यांनी वापरत भाजपच्या आंदोलनाला ट्रोल केले आहे.

भाजपा आमदार, खासदार, नगरसेवक एवढेच नाहीतर सध्या कार्यकर्त्यांना देखील कॉमेंट आणि मेसेजवरून ट्रोल केले जात असल्याचे दिसले. या परिस्थितीमध्ये ट्रोलर्स पासून वाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी घरात राहणे पसंत केले. त्यामुळे हे आंदोलन फेल झाल्याचे दिसून येत आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur