इंदापूर । मागील पंचवार्षिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही मंत्र्याने लाल दिवा वापरु नये याचा अध्यादेश काढला होता. हाच धागा पकडत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाल दिवा नसल्यामुळे सामान्य नागरिकांना कसा त्रास होतो हे उदाहरण देत स्पष्ट केलं.
महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी या खास कार्यक्रमाचे आयोजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत भिगवण येथे केले होते. यावेळी या तालुक्यात लाल दिवा नेहमीच असतो. मात्र, हे दुर्देव आहे की, मोदी साहेबांनी तुमचा लाल दिवा काडून घेतलाय. मोदी साहेबांना एक दिवस काय वाटले काय माहीत आणि ते म्हणाले की आता लाल दिवे कोणीच वापरायचे नाही. मात्र यामुळे सामान्य नागरिकाला मंत्री आले गेलेले काहीच कळत नाही. शिवाय ते कोणत्या गाडीत आहेत. हेही समजत नाही असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींवर निशाना साधला.

ज्या अर्थी चंद्रकांत पाटील वारंवार म्हणत आहेत की, हे सरकार फार काळ टिकणार नाही त्या अर्थी भाजपच्या मनात काही तरी कट करण्याचे दिसतेय. एखाद सरकार जेव्हा पाच वर्षासाठी निवडून येतं ते पाडायचे उद्योग व महाराष्ट्रातील जनतेला अडचणीत आणायचे उद्योग असली पापाची कामे आम्ही केली नाहीत असं म्हणत चंद्रकांत पाटलांवरही सुळेंनी निशाना साधला.