:राज्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा होती.राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रीय नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार का?,याबाबत प्रश्नचिन्ह होते.
दरम्यान भाजपच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवला आहे.चंद्रकांत पाटील यांच्या भाजप महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.तर मंगलप्रभात लोढा यांनी भाजप मुंबईच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घोषणा केली.भाजपकडून प्रदेशाध्यक्ष पदासाठी विनोद तावडे,पंकजा मुंडे,सुधीर मुनगंटीवार इच्छूक असल्याचे म्हटले जात होते.पण अखेर चंद्रकांत पाटील यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास ठेवला.