परंडा/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टीच्या परंडा तालुकाध्यक्षपदी राजकुमार पाटील यांची शनिवारी झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड झाली.
तालुकाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक होते. परंतु, आमदार ठाकूर यांनी सर्वांशी चर्चा करून राष्ट्रवादीतून भाजपात आलेले जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन राजकुमार पाटील यांची निवड केल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.

बैठकीस प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, अॅड. खंडेराव चौरे, परंडा तालुक्याचे निवडणूक अधिकारी सतीश देशमुख, सरचिटणीस संताजी चालुक्य, सह निवडणूक अधिकारी विठ्ठल तिपाले, अॅड. संतोष सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी मावळते तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे, आदम शेख, भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, वाशी तालुकाध्यक्ष सचिन इंगोले व कार्यकर्ते उपस्थित होते.