भरदिवसा १ लाख ८१ हजारास लुटले;बार्शी तालुक्यातील रस्तापुर शिवारात घडली घटना,दरोड्याचा गुन्हा दाखल

    0
    354

    भरदिवसा १ लाख ८१ हजारास लुटले;बार्शी तालुक्यातील रस्तापुर शिवारात घडली घटना,दरोड्याचा गुन्हा दाखल

    बार्शी  प्रतिनिधी

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    दुसरे कर्ज मंजुर होत नसल्याचे सांगितल्याचा राग मनात धरूण एक महिलेसह सहा जणांनी मिळुन दोघांना मारहाण करूण रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट असा 1 लाख 81 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटल्याचा प्रकार आज दि.28 शुक्रवारी भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुक्यातील रस्तापुर रस्त्यावर घडला.

    अतुल राजेंद्र भोसले रा.रस्तापुर ता.बार्शी व अनोळखी सहा अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. 

    अनुप विलास बोधले, वय 31 वर्षे, रा. राउळ गल्ली बार्शी यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते अडीच वर्षापासून श्रीराम फायनान्स लि. या कंपनीत सेल एक्झिकेटीव्ह म्हणून काम करतात. त्यांच्याकडे लोन व कर्ज वसुलीची कामे असतात. सदर कामाकरिता त्यांना बाहेरगावी कर्जवसूलीसाठी जावे लागते. मालवंडी, रस्तापूर, सुर्डी, उंडेगाव या भागात लोकांनी फायनान्स कडून कर्ज घेतलेले आहेत. त्याप्रमाणे अतुल राजेंद्र भोसले रा. रस्तापूर यांनी फायनान्स कडून मोटार सायकल घेण्यासाठी कर्ज घेतले होते.

    ते पैसे त्याने न भरल्यामुळे त्याची मोटार सायकल फायनान्स कंपनीने जप्त करून आणलेली होती. दोन महिन्यापूर्वी त्याने मोटार सायकलचे हप्ते भरून मोटार सायकल घेवून गेला होता. नंतर त्याने परत हप्ते चुकवल्याने त्यास हप्ते भरण्याबाबत तगादा लावल्याने काल दि. 27 फेब्रुवारी  रोजी हप्त्याचे 2700/-रू. भरून गेला होता..

    आज शुक्रवा दि.28 फेब्रुवारी2020 रोजी फिर्यादी व दिनेश गुरूदत्त इटकर असे ऑफिसमध्ये असताना अतुल राजेंद्र भोसले याने फोन करून माझ्या दुसऱ्या कर्जाच्या फाईलचे काय झाले असे विचारले होते. तेव्हा फिर्यादीने त्यास तुझे दुसरे कर्ज मंजूर होत नाही असे म्हणाले होते.

    आज सकाळी फिर्यादीने एच.डी.एफ.सी. बँकेतून साडूला देण्यासाठी 1,40,000/-रु. काढले. ते पैसे देण्यासाठी ते व दिनेश इटकर असे दोघे मिळून दुचाकी मोटार सायकलवर बसून मानेगाव, ता. बार्शी येथे जात असताना त्यांचे सहकारी मयुर रमेश गलांडे यांचा त्यांना फोन आला की तुम्ही पानगावचे काम करून उंडेगाव येथे या असे कळविल्याने ते व दिनेश इटकर असे पानगाव ते उंडेगाव येथे निघाले. तसेच रस्तापूर रस्त्याने पुढे गेले. गावाच्या अलिकडे अंबाबाईच्या मंदिराजवळ स्मशानभूमिजवळ दुपारी 12:00 वा. चे समारास आले असता तेथे फायनन्सकडून कर्ज घेतलेला अतुल राजेंद्र भोसले व एक अनोळखी महिला उभे होते.

    त्यावेळी अतुल राजेंद्र भोसले हा त्यांच्या गाडीकडे आला व त्याने गाडी पकडली व मोठ्याने छॉव असे म्हणाला. त्यावेळी बाजूच्या डोंगरावरून अनोळखी चार ते पाच इसम पुरूष असे पळत आले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. अतुल राजेंद्र भोसले याने माझे तोंड दाबले व आलेल्या अनोळखी लोकांनी काठ्यांनी मारहान केली व त्यांच्या जवळील रोख रक्कम 1,40,000/-रू. तसेच दोन मोबाईल पैकी एक मोबाईल हँडसेट तसेच सहकारी दिनेश इटकर याचे जवळील मोबाईल हँडसेट बळजबरीने काढून घेतले. नंतर ते सर्वजन पळून गेले. 

    याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात सात जनावर लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur