भटक्या विमुक्त जमाती संघटना बार्शी शहराध्यक्षपदी भोला आडसूळ तर तालुकाध्यक्षपदी अंबऋषी कोळेकर यांची निवड
बार्शी : भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य शाखेच्या बार्शी शहर अध्यक्षपदी भोला आडसूळ व तालुकाध्यक्षपदी अमृत कोळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर शहर शाखेच्या कार्याध्यक्षपदी कृष्णा उपळकर तर सचिवपदी अमोल सातपुते उपाध्यक्षपदी नागेश काळे यांच्या निवडी करण्यात आली आहे .

येथील मंगल कार्यालय उपळाई रोड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पारधी, वासुदेव, वडर, कोलाटी, नाथपंथी डवरी, माकडवाले, सापवाले, बेलदार, वैदू ,रामोशी, घिसाडी, आदी विविध भटके-विमुक्त जमाती लोक मोठ्या संख्येंर्ला कार्यक्रमास उपस्थित होते .
यावेळी नुतन पदाधिकाऱ्याच्या निवडी करण्यात आल्या आहेत . तर संघटकपदी संजय चव्हाण व महिला प्रतिनिधी म्हणून रेखा माने सुनिता काळे शकुंतला जाधव साखर काळे शशिकला जाधव यांची निवड करण्यात आली आहे या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र राज्याचे सरचिटणीस नागनाथ अडसुळ उपाध्यक्ष रामकृष्ण माने जिल्हा अध्यक्ष विष्णू गायकवाड शहाजी पवार यांचे हस्ते देण्यात आले .