ब्रिटिश शास्त्रज्ञाचा कोरोनाची लस शोधल्याचा दावा, डॉ. साराह गिल्बर्ट म्हणतात..

0
266

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे जवळपास सर्वच देश चिंताक्रांत झाले आहेत. या आजारावर औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञ जंगजंग पछाडत आहेत. ब्रिटिश शास्त्रज्ञ साराह गिल्बर्ट यांनी नुकताच एक दावा केल्याने सर्वांना आशेचा किरण दिसत आहे.

या आजारावर लस शोधल्याचा दावा त्यांनी केला असून सर्व क्लिनिकल ट्रायल्स पार करून सप्टेंबरपर्यंत यावरील लस उपलब्ध होईल, असेही त्या म्हणाल्या. जगात या कोरोनाने 2.2 दशलक्षाहून अधिक लोक बाधित आहेत, तर दीड लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. या आजारावर उपाय शोधण्यासाठी अनेक देशांत संशोधन केले जात आहे. सर्वाधिक बाधित देशांच्या यादीत ब्रिटनचादेखील समावेश आहे, जेथील शास्त्रज्ञाने लस शोधल्याचा दावा केला आहे. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीनॉलॉजी विभागाच्या प्राध्यापिका सारा गिल्बर्ट यांनी कोरोना विषाणूची लस बनवल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना गिलबर्ट यांनी असा दावा केला की, ही लस सप्टेंबरपर्यंत येईल. यासाठी आम्हाला नियोजन करून काम करण्याची गरज होती.

त्या म्हणाले की, सीएएडीएक्स तंत्रज्ञानाद्वारे 12 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आम्हाला एका डोसपासून प्रतिकारशक्तीबद्दल चांगले परिणाम मिळाले आहेत, तर आरएनए आणि डीएनए तंत्रज्ञानाद्वारे दोन किंवा अधिक डोस आवश्यक आहेत. प्रोफेसर गिल्बर्ट यांनी त्याची क्लिनिकल चाचणी सुरू झाल्याची माहिती दिली आणि विश्वास व्यक्त केला की, यावर्षी सप्टेंबरपर्यंत या लसीचे डोस उपलब्ध होतील.

Best IT Comany In Maharashtra , Solapur