बावी(आ)विद्युत सबस्टेशनला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे…

  0
  431

  बावी(आ)विद्युत सबस्टेशनला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे…उर्जा मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करणार..शंकर गायकवाड.

  बार्शी(प्रतिनिधी) दि.1फेब्रूवारी..शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली  आज सकाळी 9 वाजले पासून ते 11वाजेपर्यंत असे सुमारे 2तास बावी(आ)ता.बार्शी येथील विद्युत सबस्टेशनला शेतकऱ्यांनी टाळे ठोकून आंदोलन केले.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  त्यावेळी सदानंद आगलावे, मुसा मुलाणी,  सलीम शेख, सिध्देश्वर डोईफोडे, अमोल पाटील, रविंद्र मुठाळ, जयराम गायकवाड, अशोक आगलावे, हनुमंत भोसले, सागर उमाटे, रामेश्वर आगलावे, शंकर डोईफोडे, संभाजी आगलावे, सुधिर लोंढे, चंद्रकांत काळे, कपिल कुलकर्णी, समर्थ डोईफोडे, किसन पवार, शरद गव्हाणे, वैभव आगलावे, संतोष करडे, विजय शिंदे, मारूती श्रीखंडे, दादा साळुंखे, कृष्णा जाधव, हरी ननवरे, सोमनाथ गुरव, सुहास करडे, नवनाथ काळे आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

  सुमारे दोन तासानंतर बार्शीचे उपकार्यकारी अभियंता श्री.अरविंद भाग्यवंत यांनी आंदोलन स्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन थांबवण्यात आले.यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी मागण्यांची पुर्तता लवकरात लवकर न केल्यास उर्जा मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here