बार कॉंसिल ऑफ महाराष्ट्र ॲड. गोवाच्या सोलापूर जिल्हा प्रिव्हिलेज कमिटी सदस्यपदी ॲड संजय साखरे

  0
  333

  ॲड.संजय चंद्रकांत साखरे यांची बार कॉंसिल ऑफ महाराष्ट्र ॲड. गोवाच्या सोलापूर जिल्हा प्रिव्हिलेज कमिटी सदस्यपदी नियुक्ती

  बार्शी: महाराष्ट्र व गोवा राज्यातील विधिज्ञांची शिखर संस्था असलेल्या बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सदस्य कौन्सिल मेंबर ॲड. मिलिंद थोबडे यांच्या शिफारशीनुसारबार कौंसिलने सोलापूर जिल्ह्याच्या प्रिव्हिलेज कमिटी सदस्य म्हणून ॲड.संजय चंद्रकांत साखरे यांची नियूक्ती केलेली आहे. सदर नियुक्तीने बार्शी तालुक्यास प्रथमच, बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवा ने संधी दिली आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  ॲडव्होकेटस ॲक्ट १९६१ च्या कलम ६ अन्वये राज्यातील वकिलांचे अग्रहक्क आणि अधिकार यांच्या संरक्षणासाठी वकिली व्यवसायाची गौरव प्रतिष्ठा राखण्यासाठी बार कॉउंसिल प्रत्येक जिल्हास अशी समिती स्थापन करीत असुन दिवाणी,फौजदारी सहकार आदी न्यायालयात केलेल्या कामाचा अनुभव असल्यामुळे व वकिली व्यवसायाबद्दल प्रचंड आस्था असल्यामुळे सोलापूर जिल्हा समितीचे सदस्यपदी ॲड.संजय साखरे यांची निवड झालेली आहे.

  वकिली व्यवसायात विरूध्द पक्षकार , सहयोगी वकील, न्यायाधीश, इतर अधिकारी व शासकीय कर्मचारी यांच्याकडून वकिली व्यवसायातून कोणत्याही प्रकारे वकिलांना अडचणी आल्यास त्याकामी बार कौंसिलकडे दाद मागता येते.

  बार कौंसिल अशा प्रकरणी सदर समितीकडुन विहीत चौकशी कामकाज चालवून आलेला अहवाल बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवा च्या पूर्ण कौंसिल पुढे निर्णयासाठी सादर केला जातो. तसेच वकिली व्यवसायासाठी अद्ययावत अभ्यास प्रक्रिया तसेच कुशल वकिलांच्या जडणघडणासाठी आवश्यक दृष्टीपथ मार्गदर्शिका तयार करण्यात सदर समितीची महत्वाची भूमिका असते.????

  सदर निवडीबद्दल बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी चेअरमन आणि विद्यमान कौंसिल सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड काकासाहेब गुंड, बार्शीचे नगराध्यक्ष अॅड.असिफ तांबोळी,अॅड. निखील पाटील, ॲड.शेलार अॅड.सुमंत अॅड.घाणेगावकर, नगरसेवक ॲड.महेश जगाताप ,अॅड.आनंद ठोकडे, अॅड.इमरान तांबोळी आदी विधिज्ञ मंडळींनी ॲड.संजय साखरे यांचे अभिनंदन केले.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here