बार्शी पोलिस ठाण्यात स्वंयचलित सॅनिटायझर फॉगिंग पॉईंट सुरु
बार्शी : पोलिस कर्मचारींना कोरोना विषाणूच्या संसर्गपासुन बचावासाठी बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आता सॅनेटायझर फॉगिंग पॉईंट तयार करण्यात आला असल्याने बार्शी शहर पोलिसांना दिलासा मिळाला आहे .


वरिष्ठाच्या सुचनेनुसार तसेच उपविभागीय आधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे व बार्शी शहरचे पो.नि संतोष गिरीगोसावी यांचे मार्गदर्शनाखाली हि स्वयंचलित सॅनिटायझेशन रूम तयार करण्यास आली आहे . श्री गणेश वस्त्रदालन चे संतोष जाधवर यांनी ही रम तयार केली आहे.
या कोरोना विषाणुच्या संदर्भाने लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी आहोरात्र पोलिस विभागाला कायम जनतेचा संपर्कात राहावे लागत आहे. पण सोशल डिस्टंसिंग पाळुन पोलीस दल काम करत आहे. असे असले तरीही शहरातील फिक्स पॉईन्ट ,वाहतुक शाखेचे कर्मचारी यांच्या सोबत काहींना काही कारणांनी सार्वजनिक संपर्क येत असतो त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रभाव त्यांचेवर होवु नये म्हणून बाहेरुन आल्यानंतर व घरी जाताना पोलिस ठाण्यात उभा केलेला स्वंयचलित सॅनिटायझेशन रूमचा उपयोग करावा तसेच प्रत्येकवेळी हण्डग्लोज ,फेस मास्क , हॅण्डवॉश , सॅनेटायझरचा वापर करावा असे पो.नि गिरिगोसावी सांगितले