बार्शी शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग,एकावर गुन्हा 

    0
    268

    बार्शी शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग,एकावर गुन्हा 

    बार्शी :

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    पाणी आणण्यासाठी पाण्याच्या टाकीवर गेलेल्या अल्पवयीन मुलीचा एका तरूणाने विनयभंग केल्याचा प्रकार बार्शी शहरात उघडकीस आला आहे. मोहसीन पठाण रा. बार्शी असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. 

    याबाबत पिडीतेच्या 45 वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची चौदा वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे.फिर्यादी व पती दोघेजन दुपारी कामावर गेले होते.ते कामावर गेल्यानतर घरामध्ये मुलगी हि एकटीच असते. तसेच घरामधील धुणीभांडी व पाणी भरण्याचे काम तीच करत असते. 

    संध्याकाळी ६ वा. चे सुमारास ती पाण्याचे टाकीवर पाणी आणनेकरीता गेली होती.तेव्हा मोहसीन पठाण हा तेथे पाण्याचे टाकीचे कट्ट्यावर बसलेला होता.त्याने पिडीतेची छेड काढत अपशब्द वापरले . त्यामुळे पिडीतेने त्याला शिव्या दिल्यामुळे त्याने चिडुन जावुन पिडीत मुलीच्या कानाखाली मारली. त्यामुळे चिडलेल्या पिडीतेनेही त्याचे कानाखाली चापट मारली व आरडा ओरडा केला त्यावेळी तो तेथून पळून गेला. 

    मागील दोन दिवसापासुन मोहसिन पठाण हा पिडीता घरी असताना घरासमोर चकरा मारुन व पाठलाग करुन इशारे करत होता. परंतु तरूणी त्याचेकडे दुर्लक्ष करून याबाबत कोणाला काही बोलत नव्हती.याबाबत पठाण याच्या विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात विनयभंग व बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur