बार्शी : कोरफळे ता बार्शी येथील एका पस्तीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्या प्रकरणी जयदत्त हनुमंत बाबर रा कोरफळे याच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की सदर विवाहिता ही वरील ठिकाणी पती दोन मुलांसोबत राहण्यास आहे ती एका ठिकाणी स्वयंसेविका म्हणून काम करत आहे आरोपी जयदत्त बाबर हा मागील एक वर्षांपासून तिच्याकडे वाईट नजरेने बघून तिची छेड काढत होता पण बदनामी होईल म्हणून तिने ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती दि ९ मे रोजी दिवसभर स्वयंसेविका म्हणून काम करून सायंकाळी पाच वाजता घरी आली त्यावेळी पती शेतात मुलगा गावात आणि मुलगी चुलत्याच्या घरी गेली होती.
पीडित महिला एकटी घरात असताना आरोपी जयदत्त हा अचानक घरात आला व त्याने दरवाजा आतून बंद केला आणि हातातील धारदार चाकू दाखवून तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवतेस की नाही नाहीतर मी तुला मारून टाकीन तेव्हा पीडित महिला त्याला इथून ज नाहीतर मी आरडाओरडा करीन असे म्हणाली असता आरोपी तिच्या अंगावर धावून गेला आणि तिचा पदर ओढू लागला त्याला प्रतिकार केला असता त्याने लाथ बुक्क्यांनी मारहाण केली.

त्या झटापटीत तिच्या अंगावरील साडी ब्लाउज फाटला आणि ती स्वतःला वाचवण्यासाठी घराबाहेर पळत असताना त्याने पाठीमागून डोक्यात फरशीचा तुकडा घातला तेव्हा ती खाली जमिनीवर पडली तरीही तो लाथा बुक्यांनी मारहाण करत होता त्यानंतर ती बेशुद्ध पडली थोड्यावेळाने शुद्धीवर आली असता शेजारी राहणाऱ्या एका महिलेने जयदत्त बाबर हा शेतात जाऊन विषारी औषध पितो अशी धमकी देऊन गेला असल्याचे सांगितले आहे.
सध्या जखमी झालेल्या पीडित महिलेवर बार्शीतील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत याबाबत तालुका पोलीस ठाण्यात भा दवि ३५४,४५२,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पो ना गोरख भोसले करत आहेत