बार्शी- लातुर -कुर्डवाडी बायपास रोडवर शनिवारी सायंकाळी ७ .४५च्या सुमारास गाताचीवाडीजवळ लक्झरी क्र एम.एच. २३ डब्लु ५०२० आणि दुचाकी क्र एम. एच. ०१ – ई ए ५७१३ यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संबंधित मृत व्यक्ती मारुती रोप्स या रस्सीच्या कारखान्यात काम करत होता.

लक्झरी बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला धडक देवुन लक्झरी पत्राच्या शेडमध्ये घुसली. यामध्ये सुमारे ५०,००० रूपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुचाकीस्वार शिवाजी पांडुरंग उंदरे हा राञपाळी असल्यामुळे घाईत कामावर निघाले असताना जामगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिली. त्यानंतर, दुचाकीस्वारास बार्शी येथिल जगदाळे मामा रुणालयात नेले असता डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले.
सदरची अपघाताची फिर्याद राहुल भगवान उंदरे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे दाखल केली. घटनास्थळी सहा पोलिस निरिक्षक राहूल देशपांडे, राजेंद्र मंगरुळे, महेश डोंगरे, सचिन माने, जनार्दन शिरसट, आप्पा लोहार यांनी भेट देवून पंचना करून सदर लक्झरी बसवर २७९ , ३०४ , ४२७ , १८४ अ ,१८४ ब कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे.