बार्शी बनावट नोटाप्रकरणी त्या दोन आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी;आरोपीकडुन १लाख ६५ हजाराच्या बनावट नोटासह मोबाईल व मोटारसायकल जप्त
मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच
बार्शी : गणेश भोळे
वांगरवाडी फाटयानजीक नकली नोटा चलनात आणल्याप्रकरणी दि १४ रोजी पकडलेल्या त्या दोघांना अटक करुन त्यांचेकडुन १ लाख ६५ हजारांच्या बनावट नोटासह मोबाईल मोटारसायकलसह दोन लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना दि १५ रोजी कोर्टासमोर उभा केले असता न्यायदंडाधिकारी सबनीस यांनी दि१९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .

यात नकली नोटाप्रकरणी आरोपी उमेश भिकाजी साबळे (वय२३ रा . वालचंदनगर ता इंदापुर जि.पुणे ) मंगेश प्रल्हाद सोनवणे वय २१ रा . शेंद्री बुद्रुक ता .आष्टी जि.बीड ) या दोघांवर भादवि ४८९( ब ) (क )३४प्रमाणे बार्शी तालुक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहीती अशी की
बार्शीकडे हे दोघेजण बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना दरम्यान शेंद्री वांगरवाडी नजीक एका द्राक्ष विक्रेते महीलाकडुन द्राक्ष विकत घेतल्यानंतर त्या महिलेस शंभर रूपयाची नोट काढुन हाती दिल्यानंतर त्या महीलेस त्या नोटाबद्दल संशय आल्याने महिलेने आरडाओरड सुरू केला त्यावेळी दुचाकीवरून घाई गडबडीत निघालेल्या त्या दोघांना आजुबाजुच्या नागरीकांनी पाठलाग करून पकडुन ठेवले.

यावेळी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पोहे कॉ तानाजी धिमधीम , पोहे कॉ सचिन माने ,पोहेकॉ राजेंद्र मंगरुळे, पोना आप्पा लोहार, पोना महेश डोंगरे,पोकॉ धनराज फत्तेपुरे,पोकॉ प्रल्हाद अकुलवार ,पोकॉ पांडुरंग सगरे यांनी घटनास्थळी जावुन त्या दोघांना ताब्यात घेत त्यांचे सॅगची तपासणी केली.
असता नोटबंदीनंतर नव्या चलनात आलेल्या १०० रूपयाच्या नोटा नंबर 8DD443714 च्या 100 रुच्या 552 नोटा, नोटा नंबर 0FH529457 च्या 100 रुच्या 473 नोटा,0GV804460 च्या 100 रुच्या 621 नोटा, नोटा नंबर 9OA280599 च्या 2 नोटा,नोटा नंबर 9GT793135 च्या 2 नोटा असे एकुण १ लाख ६५ हजार रुच्या नकली नोटा मिळून आल्या.
यामुळे बनावट नोटाचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असुन या पाठीमागचा सुत्रधार अद्याप मोकाट असुन या नकली नोटाची छपाई कोठे व कशी झाली तर यापुर्वी किती नकली नोटा चलनात आणल्या याबाबत प्रश्न नागरिकांतुन उपस्थीत होवु लागला आहे