बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन दल केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण
बार्शी: बार्शी नगरपरिषदेच्या वतीने, 75 लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या अग्निशमन दल केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीत आग लागल्यानंतर ती आग विझविण्यासाठी असलेल्या, बार्शी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या विभागासाठी जवाहर हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस, दोन मोठ्या गाड्या व कर्मचारी यांकरिता नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये दोन गाड्या लावण्याकरिता तळमजल्यावर प्रशस्त व्यवस्था करून वरच्या मजल्यावर कर्मचाऱ्यांकरिता 1 बीएचके च्या दोन निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी,माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मुख्याधिकारी शिवाजी गवळी,नगरसेवक प्रशांत कथले ,बापूसाहेब वाणी,भारत पवार ,कय्युम पटेल,अमोल चव्हाण, आण्णासाहेब लोंढे,दिपक राऊत,भैय्या बारंगुळे,काकासाहेब फुरडे,शंकर वाघमारे, प्रशासन अधिकारीशिवाजी कांबळे ,जलदाय अभियंता अजय होनखांबे,दिलीप खोडके,भिमाशंकर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार राऊत म्हणाले की, हे केंद्र आणखी अत्याधुनिक करण्यासाठी काही गरज असेल तर सांगा ते साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.