बार्शी नगरपालिका: असाही एक अवलिया …… सॅल्युट
बार्शी: बार्शी नगरपरिषद चे फार्मासिस्ट केदारनाथ बेताळे.
मूळ नेमणुक जवाहर हॉस्पिटल ते बंद झाल्यामुळे सध्या पाणीपुरवठा विभाग.

हे बार्शी शहरातील गर्दीचे ठिकाण असणारे कारखाने ,एस टी आगार ,बँका ,मॉल्स इ ठिकाणी जाऊन स्वयंस्फूर्तीने नागरिकांत प्रभोधन करून कोरोना संदर्भाने जनजागृती चे काम करीत आहेत .
विशेष म्हणजे त्यांना ते कोणी सांगितलेले नाही किंवा हे जादा काम केले म्हणुन कोणी त्यांना जादा मेहनताना पण देणार नाही .परंतु समाजाप्रती बांधीलकी ,सेवा नव्हे तर कर्तव्य या भावनेतूनच हा अवलिया त्या त्या ठिकाणी जातोय.

प्रमुखांना बोलुन सर्वाना एकत्र करतोय कोरोना नेमका काय ? कश्या पद्धतीने आपण सतर्क राहावे, काय उपाययोजना कराव्या ,आपण आपले कुटुंब ,समाज ,गाव सुरक्षित राहावा म्हणुन आपण काय करू शकतो याची सोप्या शब्दात माहिती देतोय.

शंका कुशंका चे निरसन करतोय .अश्या पध्दतीने धडपडतोय कर्तव्याचा भाग म्हणुन . कुठेही या कामाचा गवगवा प्रसिध्दी न करता आपले काम आणि आपण हेच लक्ष मानुन सेवा तत्पर या अवलिया ची दखल घ्यावी वाटली म्हणुन हा शब्दप्रपंच .

कामचुकार ,काम न करता कामाचा डांगोरा पिटणाऱ्या नी किमान मनाची लाज बाळगुन “केदारनाथ ” होण्याचा प्रयत्न केल्यास पुण्यकर्म घडेल ही अपेक्षा .
पुन्हा एकदा केदारनाथ याना Grand Salute
नागेश अक्कलकोटे यांच्या फेसबुक वरून साभार
