बार्शी तालुक्यातील शेंद्री फाट्यावर सुमारे दिड लाखाच्या बनावट नोटासह दोघे जण ताब्यात

  0
  240

  बार्शी तालुक्यातील शेंद्री फाट्यावर सुमारे दिड लाखाच्या बनावट नोटासह दोघे जण ताब्यात

  बार्शी :

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  शेंद्री- वांगरवाडी नजीक सुमारे दिड लाख रुपयाच्या १०० रुपयाच्या बनावट नोटासह दोघाजणांना तेथील नागरीकांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले हि घटना शनिवार दि. १४ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे .

  यात बार्शी तालुका पोलिसांनी या बनावट नोटा खप विणाऱ्या दोघां व्यक्तीला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते

  याबाबत मिळालेली माहीती अशी की
  बार्शीकडे हे दोघेजण बनावट नोटा  बाजारात खपविण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना दरम्यान शेंद्री वांगरवाडी नजीक एका द्राक्ष विक्रेते महीले कडुन द्राक्ष  विकत घेतल्यानंतर त्या महिलेस शंभर रूपयाची नोट काढुन हाती दिल्यानंतर त्या महीलेस त्या नोटाबद्दल संशय आल्याने महिलेने आरडाओरड सुरू केला त्यावेळी दुचाकीवरून घाई गडबडीत निघालेल्या त्या दोघांना आजुबाजुच्या नागरीकांनी पाठलाग करून पकडले.

  यावेळी अधिक संशय आल्याने त्या दोघांजवळ असलेल्या बैगमध्ये पाहीले असता नोटबंदीनंतर शंभर रूपयाच्या नव्या चलनात आलेल्या नोटांसारखी हुबेहुब दिसणाऱ्या  १०० रूपयाच्या सुमारे दिड लाख रुपयाच्या बनावट रक्कम आढळल्या यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस तानाजी धिमधीम , सचिन माने यांनी घटनास्थळी जावुन त्या दोघांना ताब्यात घेतले.

  रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते. यामुळे बनावट नोटाचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे . 

  Best IT Comany In Maharashtra , Solapur