बाळपीर देवस्थान अन महादेव मंदिरासही क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
बार्शी – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भगवंत मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे,मौजे दडशिंगे येथील बाळपीर देवस्थान आणि शेळगांव येथील श्री क्षेत्र महादेव मंदिरासही क दर्जाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे.

सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून तसे पत्र देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकासासाठी तालुक्यातील दोन गावांनी तीर्थक्षेत्र मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले होते. दि 29/8/2019 च्या रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे.
सदर योजना हि ग्रामीण भागातील तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी असून या तीर्थ क्षेत्र योजनेतून मंदिरासमोर सभामंडप मंदिराकडे जाण्यासाठी काँक्रीट रस्ता, भाविकासाठी पाणीपुरवठा, शौचालय उभारणी करणे, हायमास्ट दिवा उभारणी करणे आणि मंदिर परिसर शुशोभिकरण अशा विविध प्रकारची कामे होणार आहेत सदर मंदिरास तीर्थ क्षेत्र दर्जा प्राप्त झाल्यामुळे मंदिराचा कायापालट होणार असून भाविकांची होणारी अडचण दूर होणार आहे. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी मदत होणार आहे.
दडशिंगे येथील बाळपीर देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी शिवसेना नेते & ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पांडुरंग तानाजी घोलप यांनी विशेष असं प्रयत्न केलं. त्यानंतर, 27 जानेवारी रोजी सरपंच सुदामती तुकाराम घोलप यांना BDO कडून तीर्थक्षेत्र मंजुरीचे पत्र मिळाले. गावातील मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
