बार्शी आगार वाहक शेखचा प्राणिकपणा ,सापडलेला प्रवाशाचा मोबाईल केला परत
बार्शी :
बार्शी आगारचे वाहक कुबेर इक्बाल शेख यांना वाहक नौकरी करत असताना १५००० रुपये किंमतीचा प्रवाशाचा मोबाईल सापडलेला होता त्यांनी तो मोबाईल बार्शी शहर पोलीस स्टेशनचे निर्भया पथक मधील पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास माने यांच्या ताब्यात दिला .


हेडकॉन्स्टेबल माने यांनी सदरच्या मोबाईल बाबत रितसर चौकशी केली असता तो मोबाईल मोहोळ येथील रहिवाशी सतीश चौधरी यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने आज दिनांक ४ मार्च रोजी त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा ठाकूर यांच्या हस्ते सदर चा मोबाईल ताब्यात दिला सदर वेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास माने , निर्भया एनजीओ पवन श्रीश्रीमाळ , महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सिंधु देशमुख व वाहक कुबेर शेख उपस्थित होते, तसेच कुबेर शेख यांचा प्रामाणिक पणा पाहून निर्भया प्रमुख प्रतिभा ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.