बार्शीत हमी भाव खरेदी केद्रात तुर खरेदीला सुरुवात ,हरभरा खरेदी ही लवकरच सुरु होणार
तुरीला ५८०० तर हरभऱ्याला ४८७५ रुपये दर
बार्शी प्रतिनिधी:
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भारतीय खाद्य निगम व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाभवानी कृषी साधन पुरवठा सह़ संस्था उंबरगे यांच्यामार्फत लक्ष्मी सोपान कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभाव खरेदी केंद्रामध्ये तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली.

या खरेदी केंद्रावर ३९० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती़ आजपहिल्याच दिवशी राहुल तिकटे, सुरज वांगदरे व वसंत वाघमारे या कव्हे व कोरफळे येथील शेतकऱ्यांची तूर खरेदीकरण्यात आली.

यावेळी एफसीआयचे सहा़ गुणवत्ता नियत्रंणचे सहा़ महाप्रबंधक राकेश कुमार रंजन, आ़ राजेंद्र राऊत, पुणे मंडल प्रबंधक विनय कुमार, गुणवत्ता नियंत्रक सुमित कुमार सहा़, देविदास माने, जिल्हा मार्केंिंटग अधिकारी बी़बी़ वाडीकर,नगरसेवक प्रशांत कथले, माजी उपसभापती केशव घोगरे, मर्चंट असो़चे अध्यक्ष दामोदर काळदाते, तुळजाभवानी संस्थेचे सचिव राहुल वालचंद मुंडे, तुकाराम माने, सचिन मडके , ज्येष्ठ व्यापारी दिलीप गांधी, सावळा शिंदे, बबुभाई येडशीकर, प्रशांत जामदार, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.

राजाभाऊ राऊत म्हणाले, जेंव्हा बाजारात शेतमालाचे दर पडतात तेंव्हा शासन हमीभावाने शेतमाल खरेदी करते.शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत हा सर्वांचा उद्देश आहे़ तो यानिमीत्ताने सफल होतो़ आता हरभरा खरेदी ही सुरु होणार आहे़ एकरी दिड क्विंटल तूर घेणार
बी बी वाडेकर म्हणाले, तूरीची प्रत्यक्ष खरेदी आजपासून सुरु झाली असून शेतकऱ्यांची एकरी दिड क्विंटल तूर घेतली जाणार आहे़ वजन झाल्यानंतर एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत.

हरभऱ्याची नोंदणी सुरु
हरभरा खरेदी ही सुरु होणार असून त्यासाठी शेतकऱ्यानी सातबारा, पिकपेरा नोंद, आधार कार्ड , आदी सर्व कागदपत्रे एकत्रच आणून हरभऱ्याची ही नोंदणी करुन करुन घ्यावी़ बाजारात हरभरा हा साडेतीन हजार रुपये प्रतिक्ंिवटल आहे़ तर खरेदी केंद्रावर ४८७५ रुपये दर आहे़ तर तुरीचा दर हा
बाजारात पाच हजाराच्या आपपास आहे़ तर खरेदी केंद्रावर तूर ५८०० क्विंटल ने खरेदी केली जात आहे़ सुत्रसंचलन केशव घोगरे यांनी केले.