बार्शीत सावकाराविरूध्द गुन्हा दाखल
आरोपीस अटक
मुद्दलसह व्याजाची रक्कम देऊनही सावकाराने घरी येऊन शिवीगाळ मारहाण दमदाटी धमकी दिल्याप्रकरणी जावेद दस्तगीर आतार (मुळगाव मालवंडी सध्या रा .एकविराई राड कसबा पेठ बार्शी )यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी पोलीसात एका विरूद्ध सावकार प्रतिबंधक कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
यातील आरोपी महेश उर्फ मनेश चंद्रकांत व्हनमाने (रा .मालवंडी ताबार्शी )याचे विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

दिलेल्या फिर्यादीत म्हटले की २०१७ साली फिर्यादी जावेद आतार याने आर्थिक अडचणीमुळे महेश व्हनमाने याचे कडुन ५ टक्के व्याजाने एक लाख रुपये घेतले होते तर २० जुलै २०१८ रोजी एका बॅकेचा दिड लाख रुपयाचा चेक परत दिला यामध्ये एक लाख मुद्दल व ५० हजार व्याज दिले आहे यानंतर मला आणखीन व्याजाचे २ लाख रुपये देणे बाकी आहे म्हणून फिर्यादीकडुन २० हजार रुपये जबरदस्तीने घेतले मी पैसे देऊनही माझ्याकडे आणखीन दोन लाख येणे आहे म्हणून दि ८ जाने २०२० रोजी दुपारी ४ वा फिर्यादी घरी असताना महेश व्हनमाणे याने शिवीगाळ दमदाटी करत मला माझे पैसे आत्ताचे आत्ता दे नाहीतर तुझे घर जाळुन टाकीन बायका लेकरासह खल्लास करून टाकीन अशी धमकी देऊन जबरदस्तीने खिशातील चावी काढुन नेक्सान कंपनीची कार घेऊन जाताना मला माझे व्याजाचे २ लाख रूपये दे असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी दिली यावरून बार्शी पोलीसात सावकार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे आरोपी महेश व्हनमाने यास अटक केली असुन न्यायालयाने दि २४ जानेवारी २० पर्यत पोलीस कोठडी दिली आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे हे करत आहेत.
चौकट :
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशाप्रकारे अवैद्य सावकारी करून कोणी सावकारी द्वारे देण्यात आलेल्या पैशांसाठी दबाव आणत असेल त्रास देत असेल तर नागरिकांनी निर्भीडपणे पुढे येऊन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात.
– पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी