बार्शीत सव्वा लाखाची हातभट्टी दारू जप्त; टोळी ताब्यात

0
317

बार्शीत सव्वा लाखाची हातभट्टी दारू जप्त; टोळी ताब्यात

बार्शी : देशात कोरोना व्हायरस मुळे सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचे उल्लंघन करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) येथील हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. तालुका पोलिसांनी छापा टाकून सात बॅरलमधील ८०० लिटर रसायन नष्ठ केले. तर १ लाख २० हजारांच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोमवारी सकाळी बार्शी -लातूर रस्त्यावरील जामगाव शिवारात एका हॉटेलच्या मागे हातभट्टी अड्डा सुरू होता. 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत दत्तु सुब्राव शिंदे (वय ७०), बाप्पा दत्तु शिंदे (वय-३६) आणि सर्जेराव दत्तु शिंदे (वय-२६) सर्व रा.जामगाव (आ.), ता. बार्शी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पो.कॉ. प्रल्हाद आकुलवार यांनी दिली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur