बार्शीत शहरात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; वायकुळे प्लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र

0
535

बार्शीत शहरात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; वायकुळे प्लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र

बार्शी :बार्शीतील उपळाई रोड वायकुळे प्लॉट येथील रहिवाशी असलेले एक डॉक्टर यांचा कोविड-१९ बाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. पुणे येथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


 यासह शहरातील बाधितांची संख्या ३ तर  तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या आता २१ वर पोहोचली असून आजपर्यंत तालुक्यातील बाधितांपैकी १५ जण उपचार घेवून घरी परतले आहेत. ५ जणांवर उपचार सुरू आहेत. 

दि. ४ ते ८ जून या कालावधीमध्ये भूम येथील पेशंट हा उपचारासाठी येथील हॉस्पीटल मध्ये ॲडमिट होता. दि. ८ रोजी सदरचा रूग्ण पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल झाला असता दि.१० रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. सदर रूग्ण येथील एका हॉस्पीटलमध्ये औषधोपचार घेत असताना त्याच्या संपर्कात आलेला वैदयकीय स्टाफ क्वारन्टाईन करण्यात आला होता. त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. 


त्यापैकी आयाचे काम करणारी शहरातील सोलापूर रोड भागातील महिलेचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला होता. क्वारन्टाईन करण्यात आलेल्या या स्टाफ मधील एका डॉक्टरलाही सोमवारी त्रास होवू लागल्यानंतर पुणे येथे हलविण्यात आले होते. त्यांचा तेथील स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांच्या संख्या ३ वर पोहोचली असून तालुक्यातील बाधितांची संख्या २१ झाली आहे. 

मंगळवारी बार्शी तालुक्यातील सोलापूर येथे उपचार घेत असलेले उक्कडगांव येथील १ व वाणी प्लॉट बार्शी शहर १ असे एकूण २ कोरोना बाधित व्यक्तीस उपचार पूर्ण करून बरे झालेनंतर घरी सोडण्यात आलेले आहे. त्यांना कोरोना आजाराची कोणतीही लक्षणे न राहिल्याने घरी अलगीकरणामध्ये पाठविण्यात आलेले आहे. 

सध्या बार्शी शहरातील कोविड केअर सेंटर येथे ३, हॉस्पीटलमध्ये १ व पुणे येथील खाजगी हॉस्पीटल येथे १ अशा ५ जणांवर उपचार सुरू आहेत. बार्शी शहरातील मंगळवारी १५ स्वॅब अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. अदयाप बार्शी शहर येथील ३ व ममदापूर येथील २ असे एकूण ५ अलवाल प्रलंबित आहेत. 

दरम्यान, बाधित आढळून आलेले डॉक्टर वास्तव्यास असलेला बार्शी शहरातील उपळाई रोड भागातील वायकुळे प्लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.


Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here