बार्शीत वृद्धास फसवले; पैसे काढून देतो म्हणत एटीएममधून परस्पर काढले दीड लाख रुपये:,गुन्हा दाखल

  0
  404

  एटीएममधून पैसे काढुन देण्याच्या बहाण्याने वृध्दास १ लाख ३९ हजार ९४७ रुपये परसर काढुन फसवणूक, एका विरूध्द गुन्हा दाखल

  बार्शी : एटीएम मधून पैसे निघत नसल्याने पाठीमागे थांबलेल्या इसमाने पैसे काढुन देतो हातचलाखी करत पासवर्ड घेतला व कार्ड बदली करून नंतर खात्यातील १ लाख ३९ हजार ९४७ रुपयाची रक्कम काढुन ७६ वर्षीय जेष्ठ नागरीकाची फसवणूक केल्याबद्दल अज्ञाताविरुद्ध बार्शी शहर पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे . हि घटना स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बार्शी येथे एटीएम मधून पैसे काढत असताना घडली

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  दाजी लाला बनसोडे (वय ७६ रा . पाटील प्लॉट शिवाजीनगर बार्शी ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे .


  अधिक माहीती की दाजी बनसोडे हे स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बार्शी येथे एटीएम मशीन मधून पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आले असता बनसोडे रक्कम काढत होत दरम्यान रक्कम निघत नसल्याचे पाहुन त्यांचे पाठीमागे थांबलेल्या इसमाने मी तुमचे पैसे काढुन देतो म्हणून पुन्हा एटीएम कार्ड मशिनमध्ये घातले व कार्डचा पिन दाबत असताना पाहीले मात्र त्यावेळी रक्कम मशिनमधून निघाले नाहीत त्यानंतर एटीएम कार्ड काढुन माझे हातात दिले त्यावेळी फिर्यादीस संशय न आल्याने ते घरी परतले त्यानंतर त्यानी एकदाही एटीएम कार्डचा वापर केला नाही

  . दि ५ फेब्रुवारी रोजी त्यांचे मोबाईल वर ५० हजार रुपयाचा विड्रॉल झाल्याचा मेसेज आला त्यानंतर त्यांनी स्वतःजवळील एटीएम कार्ड तपासले तर ते त्रयस्थ व्यक्तीचे असल्याचे लक्षात आल्याने त्यानी बॅकेत चौकशी केली दि ४ ते ५ फेब्रुवारी दरम्यान कार्डचा वापर करून १ लाख ३९ हजार ९४७ रुपये  अज्ञात व्यक्तीने परस्पर ट्रान्सफर व विड्रॉल करून फसवणूक केले आहे . अधिक तपास सपोनि केदार करित आहेत .

  Best IT Comany In Maharashtra , Solapur