बार्शीत महिलादिनी वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान
वीरशैव लिंगायत समाजाचा उपक्रम
बार्शी : येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी दिनांक ७ मार्च रोजी विद्यार्थीनी व महिलांच्या नृत्य स्पर्धा, स्मार्ट गृहिणी स्पर्धा घेण्यात आल्या. रविवारी दि.८ मार्च रोजी तालुक्यातील वीरमाता-वीरपत्नी यांचा कृतज्ञता गौरव, माजी आमदार श्रीमती प्रभावती शंकरराव झाडबुके यांना जीवनगौरव पुरस्कार, लिंगायत समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान आणि बार्शीचा नावलौकिक वाढविलेल्या महिलांना कोडरमा झारखंडचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांच्या हस्ते माहेरची साडी,चोळी, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र, शाल, आकर्षक फुलांचे रोप देवून गौरविण्यात आले. स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी अध्यक्षस्थानी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार वर्षा ठोंबरे-झाडबुके, नगराध्यक्ष अॅड.असिफ तांबोळी, अध्यक्ष विलास रेणके, उपाध्यक्ष डॉ.विजयकुमार केसकर, लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजाभाउ मुंडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, नगरसेवक प्रशांत कथले, सचिन वायकुळे, ओम कॉम्प्युटर्सच्या संचालिका शुभांगी नेवाळे, गणेश वस्त्र दालनच्या संचालिका मिनाक्षी यादव आदी उपस्थित होते.
महिलांच्या नृत्य स्पर्धेत विद्यार्थीनी गटातून सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल ग्रुप (प्रथम व तृतीय), साक्षी पाटील ग्रुप(द्वितीय), महिलांच्या गटातून राणी लक्ष्मीबाई ग्रुप (प्रथम), दत्त नगर ग्रुप (द्वितीय), सिध्देश्वर नगर ग्रुप (त्रतीय), स्मार्ट गृहिणी स्पर्धेत स्नेहल गुडे (प्रथम), रूपाली झाडबुके (द्वितीय), अमृता पाटील (तृतीय) विजेत्या ठरल्या. त्यांना आकर्षक बक्षीसे देवून गौरविण्यात आले.

डाॅ.सूर्यकांत घुगरे, डॉ.रविराज फुरडे, पां.न.निपाणीकर यांनी जिल्हास्तरीय पुरस्काराचे परीक्षण केले. स्मिता प्रशांत चांदणे, प्रार्थना नितीन बिजरगी, भारती शिवदारे, शिल्पा सुधीर देशमुख यांनी महिलांच्या विविध स्पर्धेचे परिक्षण केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस अक्कमहादेवी, ज.रेणुकाचार्य, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कु.सौम्या आणि कु.चिन्मयी गजानन सोपल यांनी स्वागतगीत गायले. शिल्पा संदिप मठपती, वर्षा रसाळ, सुमन अरूण चंद्रशेखर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. राहुल झाडबुके यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी, बसवेश्वर गाढवे, बाळासाहेब आडके, नागेश लामतुरे, सोमेश्वर घाणेगावकर, प्रविणकुमार गाढवे, दादासाहेब घोडके, उमाकांत बुगडे, राजाभाउ लुंगारे, विरूपाक्ष वांगी, मल्लिनाथ गाडवे, सतिश होनराव, विवेकानंद देवणे, अनिल बेणे, धनंजय धारूरकर, डॉ.मिलींद भुजबळ, विवेक डोंबे, डॉ.लुकडे, अनिरूध्द चाटी, कावळे गुरूजी, सुनिल फल्ले, जयंत हिंगमिरे, रामलिंग गुळवे, मनिषा शिलवंत, उर्मिला शेटे, करूणा हिंगमिरे, संजीवनी गुडे, उल्का डोंबे, मुक्ता आडके, वंदना देवणे, माधुरी शिलवंत, गीता चिल्हाळ, रेखा शेटे, भारती पाटील आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला गौरव
माजी आमदार श्रीमती प्रभवती शंकरराव झाडबुके (जीवनगौरव पुरस्कार),
वीरमाता-जानकाबाई धोंडीबा माळी,
वीरमाता-श्रीमती सखुबाई बब्रुवान जाधव,
वीरपत्नी-श्रीमती सुनिता संतोष शिंदे,
वीरपत्नी-श्रीमती जिजाबाई दत्तू शेरखाने,
वीरपत्नी-श्रीमती सुरेखा जयहिंद पन्हाळकर,
श्रीमती निर्मला उत्तरेशवर मठपती,सोलापूर (साहित्य गौरव पुरस्कार),
डॉ.सौ.शोभा धर्मराज कराळे, पंढरपूर (शैक्षणिक व संशोधक गौरव पुरस्कार),
कु.बिल्वा अनिल गिराम (क्रीडा गौरव पुरस्कार),
सौ.अर्चना अमेय आडके-घाणेगावकर (सहा.माेटर वाहन निरीक्षक, ),
कु.तेजस्विनी राजेंद्र वायचळ (सहा.माेटर वाहन निरीक्षक),
सौ.सुवर्णा सागर मुंडे (नगराध्यक्षा, कळंब),